हॅलो बागडे नाना आहेत का?

Foto
पुण्याच्या तरुणाचा भेजा फ्राय!
 हॅलो, बागडे नाना आहेत का ? दिवसभरातून येणारे असे कॉल पुण्याच्या युवकाला त्रस्त करीत आहेत. माजी विधानसभा अध्यक्षांकडे काही वर्षांपूर्वी असलेला मोबाईल नंबर आता या तरुणाकडे आहे. गेल्या दहा वर्षांपासून हजारो कॉल्सला उत्तर देऊन या युवकाचा भेजा अक्षरश: फ्राय झाला आहे. 
दहा एक वर्षांपूर्वी  हरिभाऊ बागडे यांच्याकडे जो मोबाईल क्रमांक होता तो आता पुण्याच्या अमित आनंद या तरुणाकडे आहे. एका शोरूम चा मालक असलेल्या अमितने हा नंबर मोबाईल कंपनीकडून मिळवला.  मात्र शासकीय पातळीवर तसेच मंत्रालयीन स्तरावरही हा क्रमांक आ. हरिभाऊ बागडे यांच्या नावाने आहे. दररोज शेकडो जणांशी संपर्क आणि लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बागडे नाना सारख्या लोकप्रतिनिधीचा नंबर या तरुणाला दिल्याने त्याला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसातून असंख्य फोन या जुन्या नंबरवर जातात. बागडे नाना आहेत का ? अशी विचारणा होते. पुण्याच्या अमित यांना बागडे नाना यांच्याविषयी माहिती असल्याने तो अत्यंत आदबीने समोरच्याला उत्तर देतो. बागडे नाना यांचा संपर्क क्रमांकही अनेकदा तो पुरवीत असतो. एकदा तर नानांच्या पीएनेच त्याला फोन करून तुम्हाला आलेले कॉल आमच्याकडे फॉरवर्ड करा असे सांगितले होते. मात्र आता बागडे नाना यांचा नंबर त्याच्याकडे नसल्याने त्याचा नाईलाज झाला आहे.
बागडे नाना यांचा नंबर मला द्या!
दरम्यान, आजही सदर युवकाला अनेकांचे फोन आले तेव्हा त्याने कृपया तुमच्याकडे बागडे नानांचा अथवा त्यांच्या पीए चा नंबर असेल तर मला द्या ? अशी विनंती केली. येणार्‍या कॉल ला मी तो नंबर देऊ शकेल ज्याने लोकांची अडचणही दूर होईल. बागडे नाना यांचे नाव मोठे आहे. अडलेल्याची कामे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझी मदत झाली तर तेवढेच मनाला समाधान वाटेल, असेही अमित आनंद या तरुणाने सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker